Mumbai Latest Cyber Fraud News : फोनवर बनावट ‘एटीएस अधिकारी’ बनून दिला धाक, तुरुंगवासाची भीती दाखवून घेतले लाखो रुपये
मुंबई | सायबर फसवणुकीचा नवा प्रकार मुंबईत उघडकीस आला असून, गिरगावमध्ये राहणाऱ्या 64 वर्षीय वृद्ध महिलेला ‘पाकिस्तानसाठी हेरगिरी’चा आरोप लावून तब्बल 22 लाख 40 हजार रुपयांना गंडवण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना 5 ते 10 जूनदरम्यान घडली असून, सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या तक्रारीनंतर प्रकरण प्रकाशात आले. Mumbai Latest Cyber Fraud News
तक्रारीनुसार, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलमध्ये स्वत:ला दिल्ली एटीएसचा अधिकारी प्रेम कुमार गुप्ता असल्याचे सांगण्यात आले. समोरच्या व्यक्तीने जम्मू-काश्मीर सीमेवरील पोलीस स्थानकात कार्यरत असल्याचंही सांगत, पीडित महिलेवर पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप केला.
या प्रकरणात महिलेवर दबाव टाकत, 10 वर्षांचा कारावास आणि 50 लाखांचा दंड होऊ शकतो, असे सांगण्यात आले. घाबरलेल्या महिलेने त्या व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर केले.फसवणूक झाल्यानंतर आरोपींचा संपर्क थांबल्याने, अखेर महिलेने साऊथ रीजन सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…