•2 कोटी 21 लाख रुपये ‘होल्ड’ करण्यात पोलिसांना यश; ‘Warburg Pincin’ नावाच्या बनावट ॲपद्वारे लुबाडले 10.98 कोटी
मुंबई | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी 98 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने (गुन्हे शाखा) अत्यंत कौशल्याने तपास करत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिसा, बिहार आणि पंजाब या राज्यांतून 7 आरोपींना अटक केली आहे.
फसवणुकीची पद्धत (Modus Operandi)
फिर्यादींना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपींनी त्यांना “Warburg Pincin” नावाचे एक बनावट मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. 29 डिसेंबर 2025 ते 19 जानेवारी 2026 या अल्प कालावधीत फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खात्यांमध्ये सुमारे 11 कोटी रुपये गुंतवण्यास लावले आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक केली.
तपास आणि अटक आरोपी
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उप आयुक्त (सायबर गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली 9 विशेष पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी ‘मनी ट्रेल’चा (पैशांचा ओघ) तपास करून पहिल्या लेयरमधील 7 खातेदारांना अटक केली.
महाराष्ट्र (गोंदिया): कुवरलाल डोमा येळे (वय 57)
उत्तर प्रदेश (देवरिया): आदर्शसेन आनंद (वय 27) आणि अमर्त्यसेन आनंद (वय 23)
ओडिसा: सुनील दीनानाथ गुप्ता (वय 41)
खिरोड चंद्रा साहु (वय 57)
बिहार (मुझफ्फरपूर): रसराज चारू बावरी (वय 32)
पंजाब (मोहाली): संजय चंदेर सिंग (वय 51)
थक्क करणारी आकडेवारी
तपासादरम्यान असे दिसून आले की, आरोपींनी बनावट नावावर उघडलेल्या बँक खात्यांमध्ये 2 कोटी 6 लाख रुपये स्वीकारले होते. या खात्यांवर देशभरातून तब्बल 13 कोटी 98 लाख 69 हजार 546 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवरून उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करून फिर्यादींच्या रकमेपैकी 2 कोटी 21 लाख रुपये होल्ड (गोठवण्यात) करण्यात यश मिळवले आहे.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…