मुंबई

Mumbai Cyber Crime : सायबर चोरांचा कट उधळला! बनावट ‘क्रिप्टो अ‍ॅप’मधून 4.98 लाखांची फसवणूक – सायबर पोलिसांनी एकही रुपया न गमावता संपूर्ण रक्कम परत मिळवली!

•सोशल मीडियावरच्या आमिषाला बळी पडलेली महिला – पोलिसांचा झपाट्याने पाठपुरावा, न्यायालयाचाही महत्त्वपूर्ण आदेश

मिरा-भाईंदर | ‘अधिक नफा, झटपट कमाई’ या आमिषाने अनेकांना फसवलंय, पण यावेळी सायबर पोलिसांनी सावधपणे आणि तत्परतेने एक मोठी फसवणूक रोखत तब्बल 4.98 लाख रुपयांची रक्कम मूळ खात्यात परत मिळवून देण्यात यश मिळवलं आहे.

काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या खत्री यांनी सोशल मीडियावर ‘COIN SWITCH’ या बनावट क्रिप्टो ट्रेडिंग अ‍ॅपची जाहिरात पाहून त्यात गुंतवणूक केली. सुरुवातीला जास्त परताव्याचे आमिष दाखवण्यात आलं; मात्र काही दिवसांनी अ‍ॅपने व्यवहार बंद केले आणि संपर्कही तुटला. फसवणूक लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रारीची NCCRP पोर्टलवर नोंदणी करून पोलिसांनी संशयित बँक खात्यांमध्ये अडकलेली रक्कम तातडीने गोठवली. तक्रारदाराच्या सहकार्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सायबर पोलिसांनी पुराव्यांसहित कोर्टात जोरदार मांडणी करून आदेश मिळवला आणि बँकेच्या मदतीने पूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परतवण्यात आली.

हि कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, ओंकार डोंगरे, महिला पोलीस अंमलदार माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार विलास खाटीक, सोमनाथ बोरकर यांनी केली आहे.

vivek

Recent Posts