Mumbai Cyber Crime : 24 तासांत 1.49 कोटींची रक्कम वाचविण्यात सायबर पोलिसांना यश; फसवणुकीची रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा होणार

Mumbai Cyber Crime Department Latest News : ऑनलाईन फसवणुकीतून नागरिकांचे पैसे लुटणाऱ्या चोरांना मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने कारवाई करत फसवणुकीतील तब्बल एक कोटी 49 लाख रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबई :- ऑनलाईन फसवणुकीतून Online Fraud नागरिकांचे पैसे लुटणाऱ्या चोरांना मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने दणका दिला.तब्बल एक कोटी 49 रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. Mumbai Cyber Crime Branch ही रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून वेगवेगळी शक्कल शोधून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ऑनलाईन फसवणुकीपासून सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांमार्फत वेगवेगळ्या उपाययोजना, तसेच उपक्रम राबविले जात आहेत.
सायबर पोलिसांनी वेळोवेळी जनजागृतीही करण्यात येत आहे. ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन 1930 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईकर ऑनलाईन फसवणुकीला बळी पडले. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यांनतर, पैसे वळते झालेल्या बँकांबरोबर संपर्क साधून पोलिसांनी रक्कम गोठवली.1 कोटी 49 लाख 87 लाख 376 रुपये विविध बँक खात्यांवर मागील 24 तासात होल्ड करून वाचवण्यात मुंबई 1930 सायबर हेल्पलाईन पथक यांना यश आले आहे.

ही कारवाई विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, Mumbai CP Vivek Phansalkar बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, शशीकुमार मिना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.श्री. दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर गुन्हे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दत्ताराम चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम सायबर ठाणे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, यांच्या 1930 हेल्पलाईन पथक, यांनी पार पाडली आहे.