Mumbai Latest Cyber Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत आणखी 80 लाखांची लूट; सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल
मुंबई :- “तुमचा भविष्य निर्वाह निधी तयार आहे… पण काही टॅक्स भरावे लागतील” – या गोड बोलण्यामागे लपले होते करोडोंचे फसवणूककथानक! अंधेरीत राहणाऱ्या 73 वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला अशाच खोट्या आमिषाने सायबर भामट्यांनी तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. Mumbai Latest Cyber Crime News
हा आर्थिक फटका केवळ पैशाचा नाही – तर विश्वासाचा आहे. निवृत्तीनंतर निवांत जीवन जगण्याची स्वप्नं पाहणाऱ्या वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
ही फसवणूक 2023 मध्ये सुरू झाली, जेव्हा आलोक मेहता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. स्वत:ला EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय) अधिकारी म्हणवणाऱ्या या व्यक्तीने पीएफ मिळवून देण्याचे आमिष दिले. पण त्यासाठी ‘टॅक्स’, ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’, ‘फाईल प्रोसेसिंग’ अशा विविध बहाण्यांनी 7 हजारांपासून थेट लाखो रुपये उकळले.
व्हॉट्सअॅपवर आले ‘धनादेशाचे’ फोटो, अर्थमंत्रालयाच्या बनावट कागदपत्रं आणि अधिकाऱ्यांच्या नावाने आलेले कॉल – या सर्व फसवणुकीचं जाळं इतकं नीट विणलेलं होतं की अनुभवी व्यक्तीसुद्धा त्यात अडकावं!
नंतर माही शर्मा नावाच्या महिलेने ‘मी CBI मधून बोलतेय’ असं सांगत पुन्हा संपर्क साधला. पुढील व्यवहारासाठी आणखी लाखो रुपये मागण्यात आले. पीडित व्यक्तीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे 60 पेक्षा अधिक व्यवहार करत पैसे ट्रान्सफर केले.
अखेर ही फसवणूक लक्षात येताच, वांद्रे येथील पश्चिम सायबर पोलिस ठाण्यात Bandra Cyber Crime News तक्रार दाखल करण्यात आली. आलोक मेहता, माही शर्मा, चक्रवर्ती आणि सुनिता तिवारी यांच्याविरोधात फसवणुकीचे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, “कोणतीही सरकारी रक्कम मिळवण्यासाठी खाजगी खात्यावर पैसे पाठवू नका,”असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…