•टेलिग्राम लिंक, फेक व्यवहार आणि डिजिटल खाती… दोन दिवसात सर्वस्व गेलं
मुंबई | ‘घरबसल्या ऑनलाईन रेस्टॉरंटला रेटिंग द्या आणि दिवसाला 5 ते 8 हजार कमवा’ अशा आमिषाच्या जाळ्यात अडकून जोगेश्वरीत राहणाऱ्या फरहीन पठाण (30 वय) यांना तब्बल 4 लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झाल्यानंतर फरहीन यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
24 जून रोजी फरहीन यांना एका अनोळखी क्रमांकावरून ‘घरबसल्या पैसे कमवा’ असा व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यामध्ये रेस्टॉरंटना रेटिंग द्या आणि दिवसाला 5 ते 8 हजार रुपये मिळवा असा दावा करण्यात आला होता. या संदेशावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला.
यानंतर त्यांना टेलिग्राम अॅपवर एक लिंक पाठवण्यात आली. ती लिंक उघडल्यावर ‘कुमारी याशिका’ नावाच्या आयडीवरून रेस्टॉरंट्सची यादी पाठवण्यात आली. फरहीन यांनी दिलेल्या सूचनेनुसार रेटिंग देऊन स्क्रीनशॉट्स पाठवले.
प्रारंभी त्यांनी दिलेल्या बँक तपशीलावर 180 रुपये पाठवण्यात आले. विश्वास निर्माण झाल्यावर पुढील व्यवहारासाठी आणखी एक टेलिग्राम लिंक पाठवली गेली. ती उघडल्यावर ‘राहुल सैनी’ नामक व्यक्तीने एक फेक डिजिटल खाते तयार करून त्यावर व्यवहार सुरू केला.
या खात्यात फरहीन यांनी 4 हजार रुपये भरले, आणि त्यावर अधिक रक्कम जमा झालेली दाखवली गेली. त्यानंतर तांत्रिक अडचणी, प्रक्रिया शुल्क, क्लिअरन्स इ. कारणे सांगत पैसे मागितले गेले. फरहीन यांनी दोन दिवसांत एकूण 3 लाख 96 हजार रुपये या फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात भरले.तपासासाठी जबाबदार संस्थेकडून पैसे मिळत नसल्यामुळे फरहीन यांना संशय आला. जेव्हा त्यांनी तपास केला, तेव्हा संपूर्ण व्यवहार एक सायबर फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी लगेच ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या प्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66 (क), 66 (ड) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 318 (4) आणि 319 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…