•फसवणूकदारांनी बनावट शेअर ट्रेडिंग ग्रुप तयार करून केवायसी, ॲप डाउनलोडच्या नावाखाली ओढले पैसे
मुंबई | मुंबईतील अंधेरी भागात दोन कुटुंबांच्या लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून WhatsApp ग्रुपद्वारे बनावट गुंतवणुकीचं जाळं विणण्यात आलं. मुंबई सायबर पोलीस विभागाने दोन्ही प्रकरणांत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणात, 43 वर्षीय व्यक्तीला ‘Fares Excel Enable’ नावाच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून बनावट SEBI सर्टिफिकेट दाखवण्यात आले. ग्रुपमधील ‘मेहूल गोयल’ व ‘शेरॉन त्रिवेदी’ या व्यक्तींनी त्यांना एका लिंकवरून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांच्या विश्वासास पात्र होऊन त्यांनी आपले संपूर्ण कुटुंब यात सामील केले आणि 48 लाख 33 हजारांची गुंतवणूक केली. नंतर 2 कोटी 26 लाखांचा नफा दाखवत 4 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे अडवण्यात आले. थोड्याच वेळात दोघेही आरोपी फरार झाले आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
दुसऱ्या प्रकरणातही अशीच फसवणूक झाली. 60 वर्षीय व्यक्तीला ‘11 Special Training Team A’ या ग्रुपमध्ये सामील करून ‘पंकज वर्मा’ या व्यक्तीने मार्केट गाइडन्स देण्याचे नाटक केले. त्यानंतर ‘दिव्या भट’ या महिलेद्वारे ‘Active Alpha’ नावाचे बनावट ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करून घेतले. केवायसीच्या नावाखाली आधार, बँक माहिती गोळा करून 10 लाख 25 हजार रुपये उकळले. गुंतवलेले पैसे परत मिळालेच नाहीत.
या दोन्ही प्रकरणांत माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, सायबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नागरिकांनी WhatsApp वरील अशा आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…