•तरुणीची पोलिसांकडे धाव, डी. एन. नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई | मोठं स्वप्न, छोटा विश्वास आणि एक चुकीचा निर्णय… अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 18 वर्षीय तरुणीला ‘बेवसिरीज’मध्ये मुख्य भूमिकेचं आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली. इतकंच नव्हे, तर तिचे संपादित अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 40 हजारांची खंडणी मागण्यात आली.
पीडित तरुणी अंधेरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात संधी शोधत होती. अशाच वेळी 11 जून रोजी तिला “भावेश” नामक व्यक्तीचा फोन आला. मी ‘जी एम स्टुडिओ’चा निर्माता असल्याचे सांगून त्याने एका नव्या वेब सिरीजसाठी तिला संधी देऊ केली. वेब सिरीजचे दिग्दर्शक राहुल पटेल, तर नायक शिवम अग्रवाल असल्याची माहितीही त्याने दिली.
या प्रकरणी पोलिसांनी भावेश, शिवम अग्रवाल आणि दोन अनोळखी मोबाइल धारकांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत तसेच फसवणूक, धमकी यांवर आधारित भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…