•वडाळा आरटीओ परिसरातील मोटार स्कूटर चोरीच्या गुन्ह्यात रेकॉर्डवरील जुना आरोपी जेरबंद
मुंबई :- मुंबईतील मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात वडाळा टी टी पोलीस ठाण्याला यश आले आहे. पोलिसांनी एका सराईत आणि रेकॉर्डवरील जुन्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या एकूण तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
नेमका गुन्हा काय?
दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 09.00 ते सायंकाळी 06.00 वाजेदरम्यान वडाळा आरटीओ ऑफिसजवळ, जे-1बिल्डिंग समोरून फिर्यादी मोहम्मद अनीस खान (वय 19) यांची मोटार स्कूटर अज्ञात इसमाने चोरून नेली होती. याप्रकरणी वडाळा टी टी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आरोपी जेरबंद
गुन्ह्याचा तपास करत असताना, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात इसम मोटार स्कूटर चोरून घेऊन जाताना दिसून आला. गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, सदरचा अज्ञात इसम हा जैद मोहम्मद आलम खान (वय 25) असून, तो पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील जुना आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी मुंबईबाहेर जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी तातडीने दोन पथके बनवून त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने वडाळा टी टी पोलीस ठाणे आणि ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी दोन गुन्ह्यांमध्येही मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण 3 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष आवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…