क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Police News : ऐन निवडणुकीच्या काळात मिरा रोड मध्ये सापडल्या बनावट नोटा; 500 च्या तब्बल…

Mira Road Crime News : मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई ; 500 रूपयांच्या तब्बल 10 हजार 352 नोटा बोगस सापडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका 19 वर्षे आरोपीला ताब्यात घेतले आहे. तब्बल 51 लाख 36 हजार रुपयांच्या बनावटी नोटा

मिरा रोड :- ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या बोगस नोटांच्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Mira Road Vasai Virar Crime Branch आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी कारवाई करत एका 19 वर्षीय तरुणाकडून तब्बल 10 हजार 352 पाचशेच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आले आहे.51 लाख 76 हजार किंमतीच्या 500 च्या बोगस नोटा पोलिसांनी जप्त केले आहे.Mira Road Police Seized Fake Currency आर्यन मनसुखभाई जाबुचा (19 वय,रा.भावनगर, गुजरात) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विचारे सहाय्यक फौजदार मनोहर तावरे यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे, 15 नोव्हेंबरच्या दुपारच्या दरम्यान डॉन बास्को स्कुल जवळ, मुन्शी कपाऊन्ह व प्रेडोन्ट पार्क रोडकडे जाणारे रस्त्यावर, मिरारोर पूर्व येथे एक व्यक्ती बनावट नोटा वितरीत करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांच्या 10 हजार 352 बनावट नोटा आढळून आल्या आहेत.आरोपी हा गुजरात राज्यातील असुन त्याचे नाव आर्यन मनसुखभाई जाबुचा आहे.त्याच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात Kashmira Police Station भारतीय न्याय संहीता 179,180 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला मुद्देमालासह पुढील तपासकरीता काशिमीरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शास्त्रेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहूल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार संग्रामसिह गायकवाड, प्रविणराज पवार, हनुमंत सूर्यवंशी, सतिष जगताप, संतोष मदने, राजाराम काळे, राजबिर संधू, महेश वेल्हे, अनिल नागरे, शिवाजी पाटील, गोवींद केंद्रे, पोलीस शिपाई साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे, अखिल सुतार, सचीन चौधरी सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0