मुंबई

Mumbai Crime News : “युरोपात नोकरी देतो” म्हणत घेतले लाखो रुपये, दोन महिला ठग मुंबईतून अटकेत

•फसवणुकीचं जाळं गोव्यात पसरवलेलं, काशिमिरा गुन्हे शाखा आणि गोवा पोलिसांची संयुक्त कारवाई

काशिमिरा | युरोपमध्ये उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवून एका दाम्पत्याकडून तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांना काशिमिरा गुन्हे शाखा कक्ष-1 आणि गोवा राज्य पोलिसांनी संयुक्त कारवाईत जेरबंद केलं.

फसवणुकीचा हा प्रकार RIS International Services Mumbai या खाजगी संस्थेच्या नावावर रचण्यात आला होता. प्रपेच्युअल रेमेडिओज (42 वय) आणि जोआना रेमेडिओज (32 वय), अशी आरोपींची नावे असून दोघींनी खोट्या नियुक्ती पत्रकांद्वारे फिर्यादी दांपत्याची दिशाभूल केली होती.

27 जुलै 2023 पासून ते 9 मे 2025 या काळात गोव्यातील क्युपेम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड विधान 419, 420, 465, 468 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(डी) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आरोपी महिला मुंबईतील नवघर, भाईंदर (पूर्व) येथील रहिवासी असून, गुप्त बातमीदार व सायबर विश्लेषणाच्या आधारे त्यांना शोधून काढण्यात आलं. 10 जून 2025 रोजी झालेल्या अटकेनंतर दोघींना क्युपेम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून, अधिक तपास सुरू आहे.

पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा येथील प्रभागीय पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उप-निरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहायक पोलीस उप-निरीक्षक अशोक पाटील, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, सन्नी सूर्यवंशी, पोलीस अंमलदार धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळेकर आणि क्युपेम पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक सिध्देश नाईक, महिला पोलीस शिपाई सेजल प्रभुदेसाई, दिक्षीता जोरे यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0