Mumbai Crime News : ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई ; देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सराईत गुन्हेगाराकडून जप्त
Mumbai Crime News : देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगल्या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी Baba Siddique Murder यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल आहे. राज्यात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये,याकरिता पोलिसांकडून कठोर कारवाई केलेली दिसत आहे. संशयितांवर तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची Mumbai Police करडी नजर आहे. अशीच एक कारवाई करत एका संशयित हालचाली करणारा सराईत गुन्हेगाराला ट्रॉम्बे पोलिसांनी Trombay Police ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहे. Mumbai Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे पोलिसांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाकडून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत असताना सराईत गुन्हेगार आदित्य शाम पारखे उर्फ मिठ्ठू (25 वय) हा संशयित हालचाली करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलीस पथकाने आदित्य याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळवून आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कलम 3, 25 शस्त्र अधिनियमन सह कलम 37(1)(अ),135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदित्य पारखे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी हा पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर आणि पथक करीत आहेत. Mumbai Police Latest News
पोलीस पथक
डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई. नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, मुंबई, राजेश बाबशेट्टी, सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश धुमाळ, पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस शिपाई देशमुख यांनी केली. Mumbai Police Latest News