मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : धमक्यांच्या आधारे अत्याचार! मेहुणीवर बलात्कार करून व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल

Mumbai Latest Crime News : बहिणीला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर पाच वेळा अत्याचार,बनावट आयडी तयार करून अश्लील चित्रीकरण आईवडिलांना पाठवले

मुंबई | मुंबईत मानवी संवेदनांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाकोला परिसरात एका 27 वर्षीय नराधमाने आपल्या अल्पवयीन मेहुणीवर वारंवार अत्याचार केला आणि तिचे नग्न चित्रीकरण करून इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी बलात्कार व पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. Mumbai Latest Crime News

धमकी, जबरदस्ती आणि व्हिडीओ कॉलचा सत्र

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी जून महिन्यात आरोपीने पीडित मुलीला धमकावणे सुरू केले. “तुझ्या बहिणीला मारीन, तिला नांदवणार नाही” अशी भीती दाखवून त्याने पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर ही अमानुष मालिका थांबली नाही.

चार ते पाच वेळा व्हिडीओ कॉल करून आरोपीने तिचे चित्रीकरण केले, आणि “जर कुणाला सांगितलंस, तर हे सगळं सोशल मीडियावर टाकीन” अशा धमक्या देत पुन्हा वारंवार अत्याचार केला.

बनावट आयडी, व्हायरल व्हिडीओ आणि कुटुंबीयांची तडफड

त्या विकृताने इतक्यावरच समाधान मानलं नाही. बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून पीडितेचे अश्लील व्हिडीओ तिच्या आईवडिलांना पाठवले. हे व्हिडीओ पाहून कुटुंबीय हादरले. त्यांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने संपूर्ण प्रकरण उघड केलं.

यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी वाकोला पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0