Mumbai Latest Crime News : घाटकोपरमधील महिलेला ढकलून सोनसाखळी हिसकावणारा तरुण पुण्यातून अटकेत
मुंबई :- “क्षणभराची लिफ्ट, आयुष्यभराची शिक्षा!” असं म्हणणं या तरुणावर अगदी तंतोतंत लागू होतं. घाटकोपरमध्ये महिलेला ढकलून सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी 350 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपशीलवार मागोवा घेत नाट्यमयरित्या पर्दाफाश केला. चोरीपूर्वी दिलेली एक साधी लिफ्टच शेवटी त्याच्या अटकेचं कारण ठरली!
20 मे रोजी सायंकाळी भटवाडीत पायी चाललेल्या रंजना घुटूकडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी एक अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावली. आरोपीने त्यांना ढकलून दिल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गुन्हा गंभीर असल्याने पोलीस दल सज्ज झाले.
परंतु ज्याठिकाणी चोरी झाली, तेथे कोणतेही सीसीटीव्ही नव्हते! त्यामुळे हा “गूढ चोर” सापडणं अवघड वाटत होतं. मात्र पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी परिसरातील 350 हून अधिक कॅमेरे तपासले आणि एका चित्रफितीत एक महत्त्वाचा दृष्य सापडला — एक तरुण दुचाकीवर एका तरुणीसोबत जाताना दिसला.
हीच तरुणी नंतर पंतनगरजवळ उतरली होती. पोलिसांनी तिचा मागोवा घेत रिक्षा क्रमांक मिळवला, आणि ती आकाश लोखंडे नावाच्या तरुणाची शाळेतील मैत्रीण असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या माहितीनुसार, आकाश तिला सहजच घरजवळ सोडण्यास निघाला होता… पण तेवढ्यात त्याने चोरी केली आणि पुण्याला पसार झाला.
पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून आकाशला तळेगाव, पुणे येथून अटक केली.चौकशीत उघड झाले की तो मुलींवर खर्च करत होता, त्यासाठी त्याने दीड लाखांची दुचाकी घेतली होती आणि कर्जबाजारी झाल्यावर त्याने चोरीचा मार्ग निवडला.
या सर्जनशील तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक कैलास तिरमारे, उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे आणि अन्य पथकांनी मोलाची भूमिका बजावली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…