मुंबई

Mumbai Crime News : “फोटो व्हायरल करीन” ची धमकी; 50 हजारांची खंडणी उकळणारा गुजरातमधून गजाआड

•तरुणाच्या खाजगी फोटोचा गैरवापर करून मानसिक छळ,नवघर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची राज्य पातळीवर कारवाई!

भाईंदर :- एका तरुणाच्या खाजगी फोटोचा गैरवापर करून, ते ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 50 हजार रुपये खंडणी स्वरूपात उकळणाऱ्या आरोपीला अखेर गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. नवघर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तांत्रिक तपास आणि राज्यांतर शोध मोहिम राबवून ही धडक कारवाई केली.

फिर्यादी नरेश जसाराम चौधरी (वय 2) यांचे खाजगी फोटो आरोपी मुकेश कांतीलाल राजपुरोहित (वय 24, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. अहमदाबाद) याने लबाडीने त्याच्या मोबाईलमधून प्राप्त केले होते. सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सुरुवातीला त्याने 50,000 रुपये रोख व ऑनलाईन स्वीकारले. मात्र, त्यानंतरही आरोपीने पैशांची मागणी सुरूच ठेवत मानसिक छळ सुरू केला.

17 मे 2025 रोजी नवघर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (BNS) कलम 308(2), 308(3) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66,67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं होतं.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजयेंद्र आंबवडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यावर पथकाने अहमदाबाद गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी मुकेश राजपुरोहितला ताब्यात घेतले.

त्याला नवघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे. आरोपी यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0