Mumbai Police Arrested Fake Police : पुणे, ठाणे व सातारा येथून चौघे अटकेत; मोटरगाडी, 39 लाख रुपये आणि सुरा जप्त
मुंबई | भुलेश्वर परिसरात शनिवारी सायंकाळी थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस असल्याचे भासवत पाच जणांच्या टोळीने एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडील 50 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी अवघ्या सहा तासांत चौघांना अटक करत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून 39 लाख रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोटारगाडी आणि धमकीसाठी वापरलेला सुरा जप्त करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News
तक्रारदार शनिवारी सायंकाळी पोपळवाडी तिसरी, भुलेश्वर येथे जात असताना चार जणांनी त्याला अडवले. पोलीस असल्याचे सांगत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत जीवावर मारण्याची धमकी देऊन 50 लाख रुपयांची बॅग हिसकावली. मोबाईलमधील सीम कार्ड काढून आरोपींनी त्याला नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्याच्या कडेला उतरवले आणि मुंबईत परतल्यास चकमकीत ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर एल.टी. मार्ग पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. तंत्रज्ञानाच्या मदतीने पुण्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सातारा येथून आणखी दोन, तर ठाण्यातील शांतीनगर येथून पाचव्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अटक आरोपींमध्ये अजय बाळकृष्ण लोखंडे, रेवणसिद्ध जावडे, सागर जाधव, विकास देहळे (सर्व सांगली निवासी) आणि दिलीप ढेकळे (ठाणे निवासी) यांचा समावेश आहे. आरोपींना 26 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…