Mumbai Crime News : अमेझॉन आणि फ्लिपकार्ड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्यांना अटक
•बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्याला मलबार हिल पोलिसांच्या गुन्हे पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले.
मुंबई :- ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची बॅग लिफ्टींग करणाऱ्या चोरट्याला मलबार हिल पोलिसांच्या गुन्हे पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेल्या बॅगेतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. मलबारील पोलीस ठाण्याच्या हार्दिक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून वस्तू डिलिव्हरी करण्याकरिता आलेल्या डिलिव्हरी बॉय च्या पार्सल ची बॅग चोरीला गेल्याची तक्रार डिलिव्हरी बॉय यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 302(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलबार हिल पोलीस ठाण्याच्या परिसरात सातत्याने होणाऱ्या चोरी बाबत पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करून या गुन्ह्या संदर्भात तपास गेला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केस आणण्याकरिता मलबार हिल पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन विशेष तपास करण्यात येवून तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपी हा प्रेम नगर झोपडपट्टी, वरळी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या राहत्या घरात आरोपी लखन नारायण वाघमारे (35 वय) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे. पुढील गुन्ह्याचा तपास मलबार हिल पोलीस ठाणे करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 02- डॉ. मोहित कुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त गावदेवी विभाग सुमन चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मलबार हिल पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने व पोलीस उपनिरीक्षक गिते, पोलीस हवालदार जाधव, पोलीस शिपाई लाडगांवकर, कुटे, सानप पोलीस हवालदार माचेवाड, पोलीस शिपाई भगत,कोकणी,तडवी, गुन्हे प्रकटीकरण पथक, मलबार हिल पोलीस ठाणे, मुंबई पोलीस शिपाई कांबळे यांनी उघडकीस आणलेले आहेत.