•सीमा शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष; विश्वासात घेऊन दस्तऐवज आणि लाखो रुपये उकळले
मुंबई | सरकारी नोकरी मिळवून देण्याचे गोड आश्वासन देत दोन तरुणांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. सीमा शुल्क (कस्टम) विभागात भरती लावण्याचे आमिष दाखवत आरोपींनी तरुणांना जाळ्यात ओढले आणि पैसे घेऊन अचानक गायब झाले. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित राठोड (वय 40) हे अंधेरी येथे वास्तव्यास असून खासगी विमान कंपनीत ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी परिचय असलेल्या पार्थ पटेल याने कस्टम विभागात चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे सांगितले. पुढे त्याने राठोड यांची ओळख एका सुभाषचंद्र नावाच्या व्यक्तीशी करून दिली, जो स्वतःला कस्टम विभागातील व्हिजिलन्स ऑफिसर असल्याचे सांगत होता. नोकरीच्या नावाखाली दोघांनी मिळून राठोड यांच्याकडून हळूहळू 3 लाख 70 हजार रुपये घेतले, तसेच सर्व आवश्यक कागदपत्रेदेखील जमा करून घेतली.
परंतु ठरल्याप्रमाणे कोणतीही नोकरी न मिळाल्याने सुमित राठोड यांनी जेव्हा परतफेडीची मागणी केली, तेव्हा आरोपी टाळाटाळ करू लागले आणि अखेर संपर्कही तोडला.
त्यानंतर, निखिल मेमाणे या दुसऱ्या तरुणालाही याच आरोपींनी सीमा शुल्क विभागातील नोकरीचं आमिष दाखवून 2 लाख 75 हजार रुपये घेतल्याचे उघड झाले. एकूण मिळून या दोघांची सुमारे 6 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
सुमित राठोड यांच्या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी पार्थ पटेल आणि सुभाषचंद्र यांच्याविरोधात फसवणूक, बनावटीने विश्वास संपादन करणे, आणि कट रचणे यांसारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरु आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…