•वर्तमानपत्रात गुंडाळून आणले होते 5 किलो सोने; डीआरआयची गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई
मुंबई | मुंबईचे सोन्याचे केंद्र असलेल्या काळबादेवी परिसरात तस्करीच्या सोन्याची मोठी विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती डीआरआय (DRI) च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनुसार लावलेल्या सापळ्यात दोन संशयित आरोपी अडकले असून, त्यांच्याकडून 5 किलो वजनाचे सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.
वर्तमानपत्रात लपवले होते 10 कोटींचे सोने
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे स्वप्निल जाधव आणि श्रेयस साळुंखे अशी आहेत. हे दोघेही काळबादेवी परिसरात सोने विक्रीसाठी आले असता, अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या वर्तमानपत्राच्या पुडक्यामध्ये पाच किलो सोन्याचे बार आढळून आले. या सोन्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा पावत्या आरोपींकडे नव्हत्या.
सोनं वितळवण्याचा कारखाना उघडकीस
आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी एका लहानशा कारखान्याचा पत्ता सांगितला. अधिकाऱ्यांनी तिथे धाड टाकली असता, तस्करीचे सोने वितळवणे, त्याचे कटिंग करणे आणि पॉलिश करण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रणा तिथे आढळून आली. या कारखान्यातून सोन्याच्या विक्रीतून मिळालेली मोठी रोकडही जप्त करण्यात आली आहे.
मोठ्या रॅकेटचा संशय
हे सोने परदेशातून कोणत्या मार्गाने आले आणि मुंबईतील कोणत्या मोठ्या व्यापाऱ्याला ते विकले जाणार होते, याचा तपास आता ‘सक्तवसुली संचालनालय’ (ED) आणि DRI संयुक्तपणे करत आहेत. या कारवाईमुळे काळबादेवीतील सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली असून, तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…