मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : मुंबईतून खळबळजनक घटना ; चोरट्यांनी दिले पोलीस कॉन्स्टेबलला विषारी इंजेक्शन

Mumbai Police News पोलीस कॉन्स्टेबलचा तीन दिवसाच्या उपचाराने मृत्यू, माटुंगा रेल्वे स्थानकात घडली घटना

मुंबई :- पोलीस कॉन्स्टेबला चोरट्यांचे एका टोळीने विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 28 एप्रिल रोजी माटुंगा रेल्वे स्थानकालगत ही घटना घडली होती. त्यानंतर 3 दिवस त्यांनी रुग्णालयात मृत्युशी झुंज दिली. पण अखेर बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईतील चोरांच्या व अंमली पदार्थ्यांच्या व्यसनींच्या टोळ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दादर रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणारे 28 वर्षीय विशाल पवार हे 28 एप्रिल रोजी साध्या वेशात ड्युटीसाठी लोकल ट्रेनमधून माटुंग्याहून सायनला जात होते. रात्री 9.30 च्या सुमारास ते गेटजवळ उभे होते. तेव्हा अचानक त्यांचा मोबाइल फोन चोरट्याने हिसकावून पळ काढला.

जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा लोकल हळूवार चालत होती. त्यामुळे कॉन्स्टेबलने लोकलमधून उडी मारून चोराचा पाठलाग केला. त्यानंतर काही अंतरावर त्यांना चोर व अंमली पदार्थांचे व्यसनी असणाऱ्या गुंडांच्या टोळीने घेरले. यावेळी कॉन्स्टेबलची त्यांच्याशी झटापट झाली. त्यात एका व्यक्तीने त्यांच्या पाठीत विषारी द्रव्याचे इंजेक्शन टोचले. त्यानंतर ते तत्काळ बेशुद्ध झाले.

सकाळी शुद्धीवर आल्यानंतर कॉन्स्टेबल घरी परतले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत जात होती. त्यानंतर सोमवारी त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे कोपरी पोलिस ठाण्यात विशाल यांचा जबाब नोंदवून भादंवि कलम 392, 394 व 328 अन्वये दरोडा, दरोड्यासाठी प्राणघातक हल्ला आणि विषारी द्रव्याचे इंजेक्शन दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकृतीत सुधारणा न झाल्याने विशाल पवार यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी हत्येशी संबंधित कलम 302 जोडण्यात आले आहे. गुन्हेगारांना त्वरीत पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0