Mumbai Crime News : सराईत गुन्हेगार अटक, आरोपींकडून गुन्हयातील मालमत्ता हस्तगत…
•सराईत मोबाईल चोरास पोलिसांनी केले अटक,आयफोन, वन प्लस, रेड मी नोट 7, सॅमसंग असे एकुण 06 मोबाईल फोन जप्त
मुंबई :- सराईत गुन्हेगार असलेला मोबाईल चोरास पोलिसांनी अटक केले आहे. आरोपीकडून एकूण सहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.11 जानेवारी 2024 रोजी फिर्यादी नावे संकेत उत्तम बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे कलम 419,420 भादवि सह कलम 66 (क), (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
गुन्हयाच्या तांत्रिक तपासाच्या आधारे अब्दुल सदावत खान हा आरोपी निष्पन्न झाल्याने त्यास 16 एप्रिल रोजी सांताक्रुझ मुंबई येथुन ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाच्या आधारे तपासात 07 इतर आरोपी निष्पन्न झाले आहेत तसेच अटक आरोपीकडुन नमुद मोबाईल सह इतर आयफोन, वन प्लस, रेड मी नोट 7, सॅमसंग असे एकुण 06 मोबाईल फोन अशी एकुण 4 लाख 79 हजार 797 रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. यातील आरोपीतावर भांडुप पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद असल्याचा पुर्व अभिलेख आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
पोलीस पथक
ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नौशाद तांबोळी, सायबर सेलचे पोलीस हवालदार अमोल पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई पगारे, पोलीस नाईक पाटकर, पोलीस शिपाई गायकवाड, सोनवणे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे.