•चोरट्यांनी कुलूप तोडून केले घरफोडी; अमर टेकचंदानी यांच्या डोळ्यादेखत आरोपींचा पळ
मुंबई, घाटकोपर | परदेशी गेलेल्या कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमधील टिळक रोड परिसरात रविवारी रात्री उघडकीस आली. चोरटे घरातून पळताना तक्रारदाराच्या नजरेस पडल्याने हा प्रकार उघड झाला असून, पंतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अमर टेकचंदानी हे टिळक रोड परिसरातील एका इमारतीत राहतात. त्यांचा मुलगा चिराग, पत्नीसमवेत कॅनडामध्ये गेल्याने मागील महिन्याभरापासून त्याचे घर बंद होते. दरम्यान, रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी चिरागच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 6.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
विशेष म्हणजे, अमर टेकचंदानी बाजारातून घरी परतत असताना हे दोन चोरटे त्यांच्या समोरून धाव घेताना दिसले. संशय आल्याने ते तत्काळ वरच्या मजल्यावर गेले असता, चिरागच्या घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरात सर्वत्र उचकापाचक झालेली होती. त्यांनी तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून, परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…