Mumbai Crime News : रिक्षा चोराला अटक, 8 गुन्हांची उकल नवघर पोलीस ठाणेची कामगीरी
Navghar Police Arrested AutoRiksha Thief : नवघर पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला केले अटक आरोपीकडून आठ गुन्ह्यांची उकल
भाईंदर :- पोलिसांनी रिक्षा चोरास अटक करून त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची केली उकलन.नवघर पोलीस ठाणे गुन्हा भा.दं. वि.सं. कलम-379 प्रमाणे19 मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयातील फिर्यादी अभिमन्यु काशिराम कनोजीया (40 वर्षे), व्यवसाय- रिक्षा चालक, साई सम्राट सोसायटी, नवघर रोड, भाईंदर पूर्व हे रिक्षा चालक असुन.18 मार्च रोजी दिवसभर फिरवून रात्री-10.30 वा.चे सुमारास आशीष बार समोर रोडवर, नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व येथे पार्क केली. त्यानंतर ते त्यांचा राहते घरी निघुन गेले. दुस-या दिवशी 19 मार्च रोजी सकाळी 7.30 वा फिर्यादी हे पुन्हा रिक्षा चालवण्यासाठी त्यांची रिक्षा घेण्यासाठी घटनास्थळावर गेले असता त्यांची रिक्षा त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी मिळून आली नाही. त्यावेळी त्यांनी त्यांचा रिक्षाचा राहते परिसरात शोध घेतला मात्र त्यांची रिक्षा त्यांना कोठेही मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी यांची रिक्षा चोरी झाल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी पोलीस ठाणेस येवुन तक्रार दिल्याने वर नमुदप्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला होता. Mumbai Crime News
नवघर पोलीस ठाणे हददीत मागील काहि दिवसांपासुन वारंवार रिक्षा चोरीचे गुन्हे होत होते. सदरची बाब ही गंभीर असल्याचे लक्षात घेवुन पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-01, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. नवघर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचना, तसेच मागील काही दिवसांपासुन पोलीस ठाणे हददीतुन चोरी गेलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्हयांचा तपासा दरम्यान प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज, तसेच वर नमूद गुन्हयातील घटनास्थळावरुन व घटनास्थळाचे आजुबाजुवरुन प्राप्त केलेले सीसीटीव्ही कैमेरांचे फुटेज यांची एकञित पडताळणी केली असता गुन्हयातील संशयित आरोपी हा वारंवार येवून रिक्षा चोरीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक तपास केला असता गुन्हयातील आरोपी हा चोरी करण्यासाठी चोरीवली, मुंबई येथून आले असल्याचे समजले होते. त्याप्रमाणे नमुद संशईत आरोपी याचा सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आय.सी कॉलनी बोरीवली पश्चिम परिसरात शोध घेतला असात नामे शशीकांत मल्लेश कामनोर (32 वर्षे) व्यवसाय रिक्षाचालक, रा.लींक रोड फुटपाथवर मंडपेश्वर मेट्रोस्टेशनच्या बाजुला, बोरीवली पश्चिम, मुंबई मुळगाव गंजीखेड, जि. गुलबर्गा, कर्नाटक हा मिळुन आला होता. नमुद आरोपी यास ताब्यात घेवुन त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास 19 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी याचाकडे पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात त्याचाकडुन एम.एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे मुंबई तसेच नवघर पोलीस ठाणे अशा वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुन-07 ऑटो रिक्षा अशी एकून रुपये-7 लाख 69 हजार किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच तपासा दरम्यान नवघर पोलीस ठाणे तसेच एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाणे मुंबई येथील रिक्षाचोरीचे एकुन-08 गुन्हे उघडकीस आलेले आहे. गुन्हयातील आरोपी याचे विरोधात भाईंदर पोलीस ठाणे कलम 392 भादविस प्रमाणे गुन्हा दाखल आहे. Mumbai Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पालचे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे,सहाय्यक फौजदार गौतम तोत्रे, पोलीस हवालदार भुषण पाटील, संतोष पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पोलीस शिपाई ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत,अरवर, पवार तसेच कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे. Mumbai Crime News