RBI Bomb Threat News : दिल्लीतील शाळांनंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. धमकीचा मेल रशियन भाषेत पाठवण्यात आला आहे. मेल मिळताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबई :- शाळा, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांना बॉम्बच्या धमकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील अनेक शाळांना धमक्या मिळाल्या. त्यामुळे एक दिवस आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) बॉम्बची धमकी मिळाली होती.हा धमकीचा ई-मेल गुरुवारी दुपारी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर पाठवण्यात आला. RBI Bomb Threat याबाबतची माहिती शुक्रवारी सकाळी समोर आली. ई-मेलमध्ये रशियन भाषेत रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.याआधीही रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात Mata Ramabai Police Station अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याआधी गेल्या महिन्यातही रिझर्व्ह बँकेला धमकी मिळाली होती.
आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी दिल्लीतील तीन शाळांना उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला. त्यानंतर विविध यंत्रणांनी शाळेच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. यापूर्वी दिल्लीतील किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ईमेल आले होते. तपासाअंती पोलिसांनी या धमक्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे.