•मरोळ परिसरातील हॉटेल ‘ड्रीम इन प्राईम’मध्ये ओळख लपवून राहत होत्या; मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
मुंबई :- मुंबईत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पवई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून युगांडा आणि केनिया देशातील एकूण 9 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली असतानाही त्या ओळख लपवून येथे राहत होत्या.
हॉटेल ‘ड्रीम इन प्राईम’वर छापा
पवई पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे परदेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी हॉटेल ड्रीम इन प्राईम, ॲकडमी स्कूल जवळ, मरोळ, मुंबई येथे छापा टाकला.
या छाप्यामध्ये खालील नमुद 9 महिला व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील आपली ओळख लपवून राहत असल्याचे उघड झाले:
1.नामटंग प्लारिया (वय 22), 2.नवीसुबी इस्तर (वय 20), 3. कुरिया सुसान बॉम्बुयी (वय 33), 4.एनजरी बथ (वय 28),5.वर सलिस्टन (वय 28),6. मेवडे मंरे सोविनया (वय 24),7. नगुकू जॉयसे वंजिरी (वय 33), 8.मुंगेरा सरह वांजिकी (वय 28), आणि 9.मेसडिंच नेली वेपकोरीया (वय 27). या सर्व महिला युगांडा आणि केनिया या देशाच्या नागरिक आहेत.
मॅनेजरवरही गुन्हा दाखल
या परदेशी महिलांना भारतामधून हद्दपार करण्याची (Deportation) कारवाई पवई पोलीस ठाण्याकडून सुरू करण्यात आलेली आहे. तसेच, परदेशी नागरिकांना अवैधपणे आश्रय दिल्याबद्दल संबंधित हॉटेलचे मॅनेजर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण (कावसु), अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड यांनी पोलीस पथकासह ही कारवाई केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…