मुंबई
Trending

Mumbai Crime News : अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाची कारवाई ; देहविक्री करिता भाग पाडणाऱ्या एका महिला अटक

Mumbai Crime News : मुंबई, साकीनाका परिसरातून 01 अल्पवयीन व 01 तरुण बळीत मुलींची देहविक्रीतून मुक्तता

मुंबई :- न्यू शालीमार कोल्ड्रींक हाउस” 7, सुपर मार्केट, साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली, ए. जी. लिंक रोड, साकीनाका, मुंबई या ठिकाणी शारिरीक संबंधाकरीता देवा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी एक अल्पवयीन आणि एक तरुणीची देहविक्री व्यवसायातून सुटका केली आहे. गुन्हे शाखा, अंमलबजावणी कक्षास त्यांच्या खास बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, छाया नावाची महिला गि-हाईकांना शारिरीक संबंधाकरीता अल्पवयीन मुली पूरवून वेश्याव्यवसाय करीत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यावर, माहितीची शहानिशा करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. Mumbai Crime News

5 मार्च रोजी महिला छाया उर्फ अम्मा लक्ष्मण देवरकी (46 वर्षे )हिने बळीत अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून देहविक्री करित प्रवृत्त व उपलब्ध करून साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील “न्यू शालीमार कोल्ड्रींक हाउस” 7, सुपर मार्केट, साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली, ए. जी. लिंक रोड, साकीनाका, मुंबई या ठिकाणी शारिरीक संबंधाकरीता पुरविले व बळीत मुलींचा वेश्यागमनाचा मोबदला स्वतःच्या उपजिविकेसाठी स्विकारताना मिळून आल्याने तिच्या विरुध्द साकीनाका पोलीस ठाणे येथे 6 मार्च रोजी कलम 366 (अ), 370 (अ), 372 भा.द.वि. सह कलम 4,5 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा 1956 सह कलम 16,17,18 बालकांचे लैंगिंग अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 सह कलम 81,87 अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Mumbai Crime News

देह विक्री करण्याकरीता प्रवृत्त करणाऱ्या आरोपीचे नाव
छाया उर्फ अम्मा लक्ष्मण देवरकी (46 वर्षे)

कारवाईत 01 अल्पवयीन मुलगी व 01 तरुण मुलीची देहविक्रीतून सुटका केली व एकूण रोख रक्कम रु पाच हजार अंदाजे पाच हजाराचा मोबाईल फोन, चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस पथक

विवेक फणसळकर पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar) , देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त, लखमी गौतम पोलीस सह आयुक्त, (गुन्हे), शशी कुमार मीना अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), रागसुधा आर. पोलीस उप-आयुक्त (अंमलबजावणी), सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमलबजावणी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक अनिता कदम, महिला पोलीस शिपाई‌ चव्हाण, पोलीस शिपाई यादव, महिला पोलीस शिपाई कांबळे यांच्या सह यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0