•चोरी केलेले 9.59 लाखांचे सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आरोपींनी जप्त
मुंबई :- मानखुर्द परिसरातील महाराष्ट्र नगर येथे घरफोडी केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले 9 लाख 59 हजारांचे सोन्या, चांदीचे दागिने,रोख रक्कम आरोपींनी काढून दिले. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
राहुल अशोक गोदरे आणि वैष्णवी राहूल गोदरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महाराष्ट्र नगर मानखुर्द परिसरात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या घरी 17 मार्चच्या दरम्यान घरफोडी होवून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण 9 लाख 59 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार ट्रॉम्बे पोलिसात फिर्यादी यांनी दिली होती. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव,गुन्हे प्रकटीकरण यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत असताना आरोपीची माहिती गुप्त बातमीदारा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून दोघा पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींनी चोरलेले सोनं हे शिवाजीनगर गोवंडी परिसरात राहणाऱ्या रिजवान असलम शेख या महिलेकडे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्या महिलेला ही ताब्यात घेतले असून तिच्यावरही कलम 317 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित जाधव करीत आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6 चेंबुर, मुंबई नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त देवनार विभाग आबुराव मोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…