Mumbai Crime News : अडीच कोटी द्या नाहीतर… हॉटेल मालकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गॅंगस्टार डीके राव ला अटक!
•90 च्या दशकापासून गुन्हेगारीच्या दुनियेत सक्रिय असलेला गॅंगस्टार डीके राव याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलचा ताबा घेण्याचा प्रयत्न करून हॉटेलचालकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी.के राव ला अटक केली आहे.
मुंबई :- हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी Mumbai Police दाऊद इब्राहिमचा याचा कट्टर दुश्मन गॅंग स्टार डीके राव Gangster DK Rao याला अटक केली आहे. डीके राव यांला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने अटक केली आहे.गँगस्टार डीके रावसह Gangster DK Rao अन्य सहा जणांनी हॉटेल ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यानंतर अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी म्हटले आहे की, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. डीके राव DK Rao यांच्यासह सातही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. डीके राव हे छोटा राजनचे जवळचे मानले जातात. डीके राव हे 90 च्या दशकापासून गुन्हेगारीच्या जगात सक्रिय आहेत.