Mumbai Crime News : मुंबईत खुलेआम दादागिरी, पोलिसांनी आरोपीला केले अटक
चुनाभट्टी पोलीसांनी खंडणी व लूटमार करणा-या आरोपीस दोन तासात अटक
मुंबई :- खुलेआम दादागिरी करण्याचा प्रकार मुंबईत उघड झाला असून फिर्यादीस त्याचे पाण्याचे पाईप लाईनचे काम करण्याकरीता पिंट्या भाई किंवा फल्लेभाई नावे गैंगला हप्ता दयावा लागेल असे धमकाविले व खंडणी न दिल्याने फिर्यादी यांस चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आणि खिशातील 2 हजार रू. जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यांचे कामकाजाचे ठिकाणावरील पाईप लूटमार करून घेवून गेल्याची तक्रार प्राप्त झाल्याने कलम 392,387,504,506 (2), 34 भादविसह 37 (1) (अ), 135 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाच्या तपास करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6,मुंबई हेमराजसिंह राजपूत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चुनाभट्टी पोलीस ठाणे, मुंबई अंकुश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आली. पथकाने सापळा रचून आकाश खंडागळे, उमेश मारूती फल्ले, राकेश उर्फ पिंन्टया रमेश राणे, सुधीर बेटकर व ऋषिकेश भोवाळ यांचेविरूध्द आरोपीतांस दोन तासाचे आत अटक केली. या आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असून त्याचेंविरोधात शरीराविरूध्दचे व मालमत्तेविरूध्दचे तसेच शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे करीत आहेत.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, हेमराजसिंह राजपूत, चुनाभट्टी पोलीस ठाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक डमरे, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, सहाय्यक फौजदार, गायकवाड, घाडगे, पोह पांढरे, बनकर, पोलीस शिपाई यमगर, पाटील, शेटे, कोळसे यांनी केली आहे.