मुंबई

Mumbai Crime News : कारमध्येच ‘नोटा छपाई’! मालवणी पोलिसांचा बनावट नोटा रॅकेटवर धडाकेबाज छापा

•Mumbai Fake Currency Racket Arrested 17 लाख 500 रुपयांच्या बनावट नोटा, लॅपटॉप, प्रिंटर, इंक आणि इतर साहित्य जप्त,तेलंगणातून आलेल्या दोघांना कारसह अटक

मुंबई, (मालवणी) :- मुंबईतील मालवणी परिसरात एका कारमधून थेट बनावट नोटा छापल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे मालवणी पोलिसांनी मार्वे बिचजवळील साईबाबा मंदिराजवळ छापा टाकत दोन इसमांना अटक केली असून, त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 1740 बनावट नोटा, तसेच छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या निगराणी पथकास मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, मार्वे बीचजवळ दोन व्यक्ती भारतीय चलनाच्या बनावट नोटांसह आढळून आल्याचे समजले. तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत, नियोजनबद्ध पद्धतीने घेराव घालून दोघांना अटक करण्यात आली.ही कारवाई 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एक निळ्या रंगाची ‘बलेनो’ कार संशयास्पद स्थितीत दिसून आली. त्वरित सापळा रचत पोलिसांनी कारमधून संपत सामवय्या एंजपल्ली (46 वय) आणि रहीमपाशा याकुब शेख (30 वय) या दोघांना अटक केली.

कारची झडती घेतली असता, त्यात बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, कलर इंक, कटर, स्केल, पेपर, सेलोटेप, कात्री व मोबाईल फोन असे साहित्य सापडले. एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे 23.30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.दोघेही तेलंगणातील असून, बनावट नोटांचे जाळे मुंबईसारख्या महानगरात पसरवण्याचा डाव पोलिसांनी वेळीच उधळून लावला आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 178,180,181,182,318(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मिना, उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेन्द्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या निगराणी पथकाने पार पाडली. कारवाईत पोलीस हवालदार अनिल पाटील, पोलीस शिपाई सचिन वळतकर, समित सोरटे, कालीदास खुडे आदी अधिकारी व जवान सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0