मुंबई

Mumbai Crime News : 3 कोटींहून अधिक किमतीचे निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर्स जप्त!

•शासनाने बंदी घातलेल्या परदेशी ‘अलबखर’ हुक्का फ्लेवर्सचा साठा मुंबईतील गोदामातून हस्तगत; एकाला अटक

मुंबई :- शासनाने बंदी घातलेल्या निकोटीनयुक्त आणि वैधानिक इशारा नसलेल्या परदेशातून आयात केलेल्या हुक्का फ्लेवर्सच्या साठ्यावर मुंबईतील गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष-1) मोठी कारवाई केली आहे. उमरखाडी, चिंचबंदर येथील एका गोदामातून तब्बल 3 कोटी 1 लाख 92 हजार 636 रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर्सचा साठा जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष-1 च्या पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, ‘एस. क्युब, डिस्ट्रिब्युशन एजन्सी एल.एल.पी.’ या नावाच्या गोडाऊनमध्ये शासनाने बंदी घातलेल्या हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निकोटीनयुक्त फ्लेवर्सचा साठा करून ठेवला आहे व तो महाराष्ट्रातील विविध वितरकांना विकला जात आहे. त्या अनुषंगाने नमुद ठिकाणी पोलीस पथकासह जावुन छापा टाकला असता, सचिन सुशीलकुमार सुरी (वय 49, एस क्युब, डिस्ट्रिब्युशन एजन्सी एल.एल.पी.चा व्यावसायिक) याने नमूद गोडाऊनमध्ये शासनाने बंदी घातलेल्या व परदेशातून आयात केलेल्या निकोटीनयुक्त ‘अलबखर’ कंपनीच्या हुक्क्याच्या पाकिटांवर चित्रमय रेखाटनासह वैधानिक इशारा नसतानाही, बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठा केला असल्याचे दिसुन आले. त्यामुळे ‘अलबखर’ कंपनीच्या हुक्का फ्लेवर्सचा एकूण 3 कोटी 1 लाख 92 हजार 636 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी डोंगरी पोलीस ठाणे येथे आरोपी सचिन सुशीलकुमार सुरी विरोधात कलम 223 बी.एन.एस. सह कलम 7 (3), 20 (2) सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने सुधारणा अधिनियम सन 2018 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कक्ष-1 कडून करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि- दक्षिण) दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-1 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागंळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास लाब्दे, पोलीस उपनिरीक्षक धिरज कांबळे, जितेंद्र शेडगे,संतोष देसाई आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0