क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Drug News : नायजेरियन व्यक्ती निघाला ड्रग्ज पेडलर, 200 ग्रॅम कोकेन

Mumbai Drug News : अंमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिट यांची कारवाई ; संशयित हालचालींवरून नायजेरियन व्यक्तीला केले अटक, नायजेरियन व्यक्तीकडे 200 ग्रॅम कोकेन, पोलिसांचा संशय यशस्वी

मुंबई :- वसई विरार मीरा भाईंदर यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन (Nigerian People) वस्ती आहे. या नायजेरियन वस्ती मधून अनेक लोक बेकायदेशीर रित्या ड्रग्ज अमली पदार्थ यांचे तस्करी करत असतात अनेक वेळा अनेक आरोपींना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट यांनी एका नायजेरियन ड्रग्ज पेडलर (Nigerian Drugs Pedlar) 200 ग्रॅम कोकेन‌ या अंमली पदार्थसह अटक केली आहे. Mumbai Drug News

संशयित हालचालींवरून नायजेरिया ड्रग्ज पेडलर अटक

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट चे पथक मुंबई शहरातील अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणारे व्यक्तीचा शोध घेत असताना पथकास मदनपुरा, नागपाडा, मुंबई 08 या परिसरात एका परकीय नागरिकाच्या हालचाली संशयास्पद दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचेकडे 200 ग्रॅम ‘कोकेन’ हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे अंदाजे रूपये 80 लाख एवढी किंमत आहे. तसेच परकीय नागरिक हा कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्याने परकीय नागरिकाविरुध्द एनडीपीएस कायदा 1985 प्रमाणे तसेच परदेशी नागरीक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. Mumbai Drug News

न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली

अटक आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने दिनांक 27 मे रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.

‘अंमली पदार्थमुक्त समाज’ बनविण्याचे दृष्टीने बृहन्मुंबई पोलीस दल सतत प्रयत्नशील अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्यांनी विरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे.

विवेक फणसळकर, (Mumbai CP Vivek Phansalkar) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प. वि. कक्ष, गुन्हे शाखा, वरळी युनिटवे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम हे करत आहेत. Mumbai Drug News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0