मुंबई

Mumbai Crime News : चिराबाजार परिसरात मुंबई गुन्हे शाखेचा छापा; 42 लाखांच्या प्रतिबंधित ‘ई-सिगारेट’सह एकाला अटक

•JUUL कंपनीचे 384 डिव्हाईस आणि 2880 पॉड्स जप्त; मालमत्ता कक्षाची धडक कारवाई; लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई l मुंबई शहरामध्ये अवैधरित्या ई-सिगारेट विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दक्षिण मुंबईतील चिराबाजार परिसरात सापळा रचून 42 लाख 4 हजार रुपयांच्या प्रतिबंधित ‘JUUL’ कंपनीच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली त्याची ई-बाईकही हस्तगत केली आहे.

असा उघड झाला ई-सिगारेटचा साठा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मालमत्ता कक्षाचे पथक 24 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास जे.एस.एस. रोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी चिराबाजार बस थांब्याजवळ एक इसम आपल्या इलेक्ट्रिक बाईकवरील दोन मोठ्या बॉक्ससह संशयास्पद रितीने उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संशयावरून त्याची विचारपूस केली आणि पंचांसमक्ष त्या बॉक्सची झडती घेतली. यावेळी बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी बनावटीच्या ‘JUUL’ कंपनीच्या ई-सिगारेट आणि त्यासाठी लागणारे पॉड्स आढळून आले.

42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत या कारवाईत पोलिसांनी 23 लाख 4 हजार रुपये किमतीचे ‘JUUL’ कंपनीचे 384 ई-सिगारेट डिव्हाईस आणि 18 लाख रुपये किमतीचे 2880 ‘JUUL’ पॉड्स जप्त केले आहेत. याव्यतिरिक्त आरोपीची 1 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची ‘वज्र’ कंपनीची ई-बाईकही पोलिसांनी जप्त केली. असा एकूण 42 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. भारतात ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि जाहिरातीवर पूर्णपणे बंदी असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे.

कडक कायदेशीर कारवाई अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ‘द प्रोहिबिशन ऑफ ई-सिगारेट्स ॲक्ट 2019’ मधील कलम 3, 4 आणि 7 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. हा प्रतिबंधित माल मुंबईत कोठून आला आणि त्याचा मुख्य पुरवठादार कोण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाच्या पथकाने पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago