मुंबई:- मुंबईच्या पवई परिसरात चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. या धडाकेबाज कारवाईत राम मोबाईल सर्व्हिस सेंटरचे मालक (वय ३७) व एक २१ वर्षीय कामगार यांना रंगेहात पकडण्यात आले असून, दोघांनाही २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कसा उघड झाला प्रकार?
१९ सप्टेंबर रोजी स.पो.नि. धुतराज यांना गुप्त माहिती मिळाली की, तुंगागाव, साकीविहार रोडवरील राम मोबाईल सर्व्हिस सेंटर येथे चोरीचे मोबाईल स्वीकारून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री केली जाते.
कक्ष-६ पथकाने डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. ग्राहकाने मोबाईलचा आयएमईआय बदलण्याची मागणी केल्यावर, दुकानातील कामगाराने क्षणार्धात “अनलॉक टूल” वापरून आयएमईआय बदलला आणि मोबाईल परत दिला.
याच क्षणी गुन्हे शाखेने छापा टाकत दोघांना जेरबंद केले.
छाप्यात चौकशीत कामगाराने सांगितले की, तो गुगल क्रोमवरील “अनलॉक टूल” चा वापर करून मोबाईलचे आयएमईआय बदलत असे. या तंत्राचा वापर करून चोरीच्या मोबाईलचे मूळ ओळख क्रमांक गायब करून त्यांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा खुलासा झाला.
या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ९९१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गुन्हे शाखा कक्ष-६ करत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-६ चे प्रभारी पो.नि. भरत घोणे, स.पो.नि. धुतराज, पो.नि. सावंत आणि त्यांच्या पथकाने राबवली. पथकातील प्रत्येकाच्या सतर्क हालचालींमुळे मोबाईल रॅकेटचा खेळ संपुष्टात आला.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…