क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Naygaon Police News : लाखोंचा मुद्देमाल नष्ट! नायगावच्या देवकुंडी जंगलात अवैध दारू भट्ट्यांवर गुन्हे शाखेचा ‘ऑपरेशन क्लीन’

Naygaon Police Latest News : 3,600 लीटर ‘हातभट्टी वॉश’ जागेवरच जाळून टाकले; 3.10 लाखांचा मुद्देमाल नष्ट करत 2 आरोपींना अटक

वसई :-;मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-2 (वसई)Vasai Crime Branch Unit 2 ने नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकुंडी जंगल परिसराला अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांच्या तावडीतून मुक्त केले आहे. एका धडक कारवाईत पोलिसांनी दोन अवैध गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. Naygaon Police Latest News

गुन्हे शाखेला कामण गावातील देवकुंडी जंगल परिसरात काही व्यक्ती अवैधरीत्या दारू निर्मितीची भट्टी लावत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, 18 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने तातडीने या घनदाट जंगल परिसरात छापा मारला. Vasai Virar Latest Crime News

पोलिसांनी या ठिकाणाहून सुनिल यशवंत वाघात आणि प्रकाश किसन कोल्हा या दोन आरोपींना ताब्यात घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा 3,600 लीटर ‘वॉश’ (कच्चा माल), 100 लिटर तयार दारू आणि दारू तयार करण्याची साधने असा ३ लाख 10 हजार 200 रुपये किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल जागीच नष्ट करून टाकला. Vasai Virar Gavathi Daru Bhatti Busted News

या आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0