क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Crime News : “पित्याच्या राक्षसी हातून अल्पवयीन मुलीचा खून; पत्नी गंभीर जखमी!”

Mumbai Police Latest News : मुंबई गुन्हे शाखेची बिहारपर्यंत धडक कारवाई — खूनी पतीला गजाआड! 💥

मुंबई :– वाकोला परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे! एका नराधम पित्याने कौटुंबिक वादातून स्वतःच्या १४ वर्षीय निरागस मुलीचा निर्घृण खून करत पत्नीला गंभीर जखमी केले. Mumbai Latest Murder News
ही घटना दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री वाकोला पोलीस ठाण्याच्या Wakola Police Station हद्दीत घडली. Mumbai Police Latest Crime News

आरोपी मो. सुलेमान रज्जाक कुजरा (वय ४०, रा. कलिना, सांताक्रूझ पूर्व) या विकृत पतीने पत्नी नसीमा (वय ३५) आणि मुलगी असगरी (वय १४) यांच्यावर वजनदार हत्याराने भयंकर हल्ला केला. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नीला गंभीर दुखापत होऊन तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९७०/२५ भा.न्या.सं. कलम १०३(१), १०९(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर आरोपीने मोबाईल बंद करून पसार होऊन मुंबई पोलिसांना अक्षरशः सळो की पळो केले! पण मुंबई गुन्हे शाखेच्या तेजस्वी पथकाने बिहारपर्यंत पाठलाग करून त्याला अखेर गजाआड केले.
तांत्रिक तपास, सखोल चौकशी आणि चोख गुप्त माहितीच्या आधारे आरोपी त्याच्या मूळ गावी, बिहारमध्ये लपल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ आणि १० च्या संयुक्त पथकाने सापळा रचून त्याला पकडले.

या थरकाप उडवणाऱ्या कारवाईचे मार्गदर्शन मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम, सह आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निशीथ मिश्रा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर आणि सहाय्यक आयुक्त प्रशांत राजे यांनी केले.
कारवाईत प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, पोनि विशाल राजे, सपोनि महेंद्र पाटील, मनोजकुमार प्रजापती, राहुल प्रभु, संग्राम पाटील, रोहन बगाडे, पोउपनि सुजित म्हैसधुने व त्यांच्या चमूने सिंहाची भूमिका बजावली.

मुंबई पोलिसांच्या या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले की —

“अपराध कितीही दूर पळाला, मुंबई पोलिसांच्या हातातून सुटणे अशक्य आहे!” 💣

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0