क्राईम न्यूज

Mumbai Crime News : बोरीवलीत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; कॉलेज प्राचार्य अटकेत

Borivali Latest Crime News : 17 वर्षीय विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या 37 वर्षीय प्राचार्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल,POCSO आणि BNS अंतर्गत गंभीर कारवाई

मुंबई :- बोरीवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या प्राचार्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्राचार्य, (वय 37), गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थिनीचा मानसिक व लैंगिक छळ करत होता.

पीडित विद्यार्थिनी नागपाडा परिसरातील असून ती आपल्या पालकांसह राहते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना प्राचार्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी तिचा पाठलाग केला आणि असभ्य वर्तन करत तिला त्रास दिला.

विद्यार्थिनीने अखेर धाडस दाखवून MHB पोलीस ठाण्यात Borivali MHB Police Station जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध BNS कलम 74,75 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत तो पोलिस कोठडीत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

vivek

Recent Posts