Mumbai Crime News : मेरठमधील चोरीचे धागेदोरे मुंबईत, गुन्हेगारांना 24 तासांत अटक

Merath Criminal Arrested In Mumbai : 57 लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; बोरीवलीत सापळा रचून दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने पकडले
मुंबई :- उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर तोडून कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Beanch अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. आरोपींकडून 57 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात मोठी चोरी करून आरोपी मुंबईच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बोरीवली येथे सापळा रचला. या सापळ्यातून सौरभ तानाजी साठे (वय 21) आणि मोहन मारुती पवार (वय 24) या दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपींच्या ताब्यातून 478.45 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 48 लाख रुपये), 3.795 ग्रॅम पक्की चांदी (अंदाजे किंमत 4.50 लाख रुपये), 8 किलो कच्ची चांदी (अंदाजे किंमत 4.76 लाख रुपये) आणि 20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 57 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस उपनिरीक्षक भरत घोणे, पोलीस हवालदार सुर्वे, गोवळकर, मेन्या, खताते, खांडेकर, शिंदे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.


