Mumbai Crime News : मुंबईत मोठी शस्त्र तस्करी उघड! घाटकोपरमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यापूर्वीच आरोपी जेरबंद

Mumbai Latest Crime News : मध्य प्रदेशातील तरुणाला पंतनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले; 1 लाखांपेक्षा अधिक किमतीची शस्त्रे जप्त
मुंबई :- मुंबईची आर्थिक राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणांनी पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील घाटकोपर बस आगाराजवळ बेकायदेशीररित्या शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील एका तरुणाला पंतनगर पोलीस ठाण्याच्या गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. Mumbai Latest Crime News
पंतनगर पोलीस ठाण्याचे Pantnagar Police Station अधिकारी राजेंद्र गायकवाड यांना दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी विश्वसनीय सूत्रांकडून एक इसम विनापरवाना अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने घाटकोपर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने साध्या वेशात त्या ठिकाणी सापळा लावला. दुपारी साधारण साडेतीन वाजता खबरीतील वर्णनाचा इसम आला असता, त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले.
या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 1 लाख 9 हजार रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. ताब्यात घेतलेल्या आरोपीने त्याचे नाव अजय कैलास कायता (वय 24, रा. उज्जैन, मध्य प्रदेश) असे सांगितले आहे. त्याने विनापरवाना अग्निशस्त्रे विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला विक्रोळी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलीस कोठडीत आरोपीकडून या अवैध शस्त्रास्त्रे तस्करीच्या नेटवर्कचा आणि त्याच्या मुंबई भेटीमागच्या उद्देशाचा सखोल तपास केला जाईल.



