•बनावट ॲपद्वारे कोट्यवधीची फसवणूक; आरोपी भाविक पेठानाच्या खात्यात एक कोटी 50 लाख रुपये जमा झाल्याचे उघड.
मुंबई :- बनावट शेअर मार्केट ॲप्स आणि खोट्या नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीतील एका महत्त्वाच्या बँक खातेधारकाला दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीच्या बँक खात्यात थेट 1 कोटी 50 लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसरा आरोपी अटकेत
गुन्ह्याच्या तपासादरम्यान, फिर्यादीच्या बँक खात्यातून ‘Ascent IT Service’ या कोलकत्ता येथील कंपनीच्या बँक खात्यावर दोन ट्रान्झॅक्शनद्वारे 1.50 कोटी रुपये (एक कोटी पन्नास लाख रुपये) वळते झाल्याचे आढळले. या कंपनीच्या ‘केवायसी’ची तपासणी केली असता, त्याचे एक डायरेक्टर भाविक मोहन पेठाना (रा. गोरेगाव, मुंबई) असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी शोध घेऊन आरोपी भाविक पेठाना याला ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी याच गुन्ह्यातील पहिल्या लेयरच्या खात्यात 31 लाख रुपये गेलेल्या रेहान नियाज अहमद ठाणगे या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
देशभरात 74 तक्रारी
अटक आरोपी भाविक मोहन पेठाना हा डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या बँक खात्याविरुद्ध नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर देशभरातून 74 तक्रारी दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उत्कृष्ट कारवाई केली असून, या आंतरराज्यीय रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…