Mumbai Latest Crime News : अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; साकीनाका पोलिसांची धडक कारवाई
मुंबई: नोकरीच्या शोधात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 62 वर्षीय व्यावसायिकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रफुल्ल लोढा याने 16 वर्षीय पीडित मुलीला नोकरीचे आमिष दाखवून चकाला येथील त्याच्या लोढा हाऊसमध्ये तिच्यावर अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, त्याने तिच्या 16 वर्षीय मैत्रिणीवरही अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. Mumbai Latest Crime News
या नराधमाने केवळ अत्याचार करून थांबला नाही, तर दोन्ही मुलींची अश्लील छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा या मुलींनी जाब विचारण्यासाठी आरोपी लोढाकडे संपर्क साधला, तेव्हा त्याने त्यांना मारहाण केली आणि एका पीडित मुलीच्या मैत्रिणीला लोढा हाऊसमध्ये डांबून ठेवले.
या गंभीर प्रकरणी साकीनाका पोलिसांनीSakinaka Police तात्काळ कारवाई करत आरोपी प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 352 (2) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम 4,8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. साकीनाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपी लोढाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…