Aaditya Thackeray : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार?आदित्यचा राज ठाकरेंना ‘महाराष्ट्रासाठी’ हृदयस्पर्शी संदेश!

Aaditya Thackeray On Raj Thackeray: “भांडणं विसरू, मराठी अस्मिता वाचवू – चला एकत्र येऊ!”
मुंबई :- राजकीय वैर, जुनी कटुता आणि दोन दशकांचा दुरावा… पण आता वाटतेय सगळं मागे टाकण्याची वेळ आलीय! शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत मनसेला साद घातली आहे. “महाराष्ट्रविरोधी शक्तींविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र यायला हवं!”
आदित्य ठाकरे म्हणाले, “राज ठाकरेंनी या विषयावर बोललं, आणि आम्ही लगेच उत्तर दिलं. आता त्यांच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा. आम्ही आजही तिथेच आहोत जिथे पूर्वी होतो – महाराष्ट्र, देश आणि समाजाच्या भल्यासाठी सज्ज!”
ही फक्त एक राजकीय प्रतिक्रिया नव्हे, तर भविष्यातील महत्त्वाच्या समीकरणांची नांदी असू शकते. कारण ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सुलहाची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच सूचकपणे म्हटलं होतं.”छोट्या वादांना विसरून आपण मोठ्या हितासाठी एकत्र येऊ शकतो. मात्र त्यांनी एक अट ठेवली “राज ठाकरेंचा भाजप किंवा शिंदे गटाशी संबंध नसावा.”
त्याला उत्तर देताना राज ठाकरेही म्हणाले होते “मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं अवघड नाही.”


