मुंबई

Mumbai Crime News : काशिमीरा पोलिसांची ‘अड्डा बार’वर मोठी कारवाई; विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या 11 जणांना अटक

  • लाऊडस्पीकरवर गाणी लावून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा; 1.18 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

मीरा रोड/काशिमीरा :- मद्यविक्रीचा कोणताही परवाना नसताना ग्राहकांना बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल चालक-मालकांवर काशिमीरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंशी कंपाउंड, मिरागाव येथील ‘अड्डा बार ॲन्ड रेस्टॉरंट’ येथे विनापरवाना दारू विकली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हॉटेलचे चालक, मालक आणि वेटरसह एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले

25 ऑक्टोबर 2025 रोजी काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मुंशी कंपाउंड, मिरागाव येथील ‘अड्डा बार ॲन्ड रेस्टॉरंट’ येथील दुसऱ्या माळ्यावर हॉटेलचे चालक व मालक विनापरवाना दारू विक्री करत होते. विशेष म्हणजे, सदर ठिकाणी ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती आणि ग्राहक लाऊडस्पीकरवर गाणी लावून नृत्य करीत होते.सदर माहितीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाणे आणि पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-1 मिरारोड यांचेकडील पथकाने संयुक्तपणे छापा कारवाई केली.

जप्ती व गुन्हा

हॉटेलचे चालक/मालक व ग्राहकांना दारू पुरविणारे वेटर असे एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले.बारमध्ये विनापरवाना विक्रीकरीता ठेवलेल्या रेडलेबल, रॉयल स्टॅंग, ऑक स्मित, ब्लेंडर प्राईड, कैमिनो टकीला व इतर विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूच्या बाटल्यांची एकूण किंमत 1 लाख 18 हजार 455 इतकी आहे.

नमुद हॉटेलचे चालक/मालक/वेटर अशा एकूण 11 जणांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1941 चे कलम 65(ई) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (डब्लु)/131 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, दत्ताजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, राहुल चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1,गणपत पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago