क्राईम न्यूजमुंबई

Firing in Antop Hill Sion Koliwada : सायन मध्ये झालेल्या त्या गोळीबारानंतर, विवेक सापडला.

Firing in Antop Hill Sion Koliwada : दोन दिवसांपूर्वी सायन कोळीवाडा मध्ये पहाटे गोळीबार झाला होता, गोळीबारानंतर विवेक फरार होता

मुंबई :- ॲन्टॉपहिल Antop Hill Sion Koliwada परिसरात दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान गोळीबार झाला या गोळीबारानंतर विवेक फरार होता. गोळीबार झाल्यानंतर मयात कुटुंबाच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक नामक व्यक्ती यांनी हा गोळीबार केला असून पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.प्रकाराबाबत ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे या ठिकाणी अज्ञात इससाच्या विरोधात वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखे मार्फत, करण्यात येत होता. त्या करीता गुन्हे शाखेची Crime Branch Department वेग-वेगळी पथके स्थापन करून अज्ञात इसमाचा शोध घेण्यात येत होता. Mumbai Crime News

9 एप्रिल रोजी गुन्हे शाखेकडून स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत तांत्रीक बाबींचा अभ्यास करुन तसेच पारंपारीक मानवी कौशल्याच्या आधारे सदर गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना नमुद आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून डोंबीवली परिसरात लपून बसला अराल्याची गोननिय माहिती गुन्हे शाखा, कक्ष-4 Mumbai Crime Branch 4 ला प्राप्त झाली होती. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने डोंदवली परिसरातील कोळेगांव, कटई नाका या ठिकाणी गुप्तपणे सापळा रचून थांबले अराता नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी हा सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास आला असता त्यास नमुद पथकाने पळून जाण्याची संधी न देता घेरावा घालून व झडप टाकून ताब्यात घेतले. व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाच्या सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतूसे व एक रिकामी पुंगळी तसेच त्याने गुन्हयाच्या समयी वापरलेले कपडे मिळून आले ते पंचनाम्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहेत. Mumbai Crime News

नमुद आरोपीकडे चौकशी केली असता नमुद आरोपीस न्यायालयाने कोव्हीड कालावधित अभिवचन रजेवर सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा कारागृहामध्ये हजर झालेला नाही. त्याच्या विरोधात खुन, खुनाचा प्रयत्न व अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकूण 12 गंभीर गुन्हे दाखल असल्याची व त्याच्या विरोधात वेग-वेगळ्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट देखील जारी केली आहेत. Mumbai Crime News

आरोपीकडे कौशल्यपुर्ण चौकशी केली असता तो नजीकच्या काळामध्ये आणखी दोन इसमांवर जिवघेणा हल्ला करणार असल्याची माहिती समजून आली. अशा प्रकारे नमुद आरोपीताच्या अटके मुळे दोन इसमांचा प्राण वाचविण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar ), विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य), चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक शामसुदर भिसे, पोलीस उपनिरीक्षक भावे, सहाय्यक फौजदार वशिष्ठ कोकणे, शेडगे, पोलीस हवालदार शरद शिंदे, पोलीस हवालदार निर्भवणे, संजय तुपे, देवार्डे, पोलीस शिपाई संजय गायकवाड, प्रमोद‌ पाटील, शुभम सावंत, सय्यद, प्रसाद गरवड चव्हाण यांनी पार पाडलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0