•दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हस्तगत; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या; परिमंडळ-4 मधील इतर गुन्ह्यांचीही कबुली
मुंबई | माटुंगा परिसरात बंद घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड पळवणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. सरुद्दीन ताजुद्दीन शेख (33 वय) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील घरफोडीचे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेमकी घटना काय?
6 जानेवारी 2026 रोजी माटुंगा येथील एका रहिवाशाचे घर बंद असताना, चोरट्याने घराचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील 2 तोळे वजनाची सोन्याची साखळी (किंमत अंदाजे 50,000 रुपये) आणि 20,000 रुपयांची रोकड असा एकूण 70,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंब्र्यातून ठोकल्या बेड्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुंब्रा परिसरात असल्याची खात्री पटली. माटुंगा पोलिसांनी मुंब्र्यात सापळा लावून सरुद्दीन शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, चोरीला गेलेली दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
18 गुन्ह्यांचा ‘रेकॉर्ड’ उघड
पोलिसांनी आरोपीचा गुन्हेगारी इतिहास (Crime Record) तपासला असता, तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत त्याच्यावर एकूण 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
माटुंगा येथील गुन्ह्याव्यतिरिक्त त्याने परिमंडळ-4 मधील आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे आणि भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
यशस्वी पथक ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण आणि पोलीस उप-आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने (तांबे, बंजारा, नेहारे, नवले, बारशी) या गुन्हेगाराला गजाआड केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…