मालाड परिसरातील दोन प्रमुख ठिकाणी अवैधरित्या आढळलेल्या 4 बांग्लादेशी नागरिकांना दोषसिद्धी
मुंबई | मुंबईतील मालाड पूर्व परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरीकांविरुद्ध पोलिसांनी एकदिवसीय मोठी कारवाई केली असून न्यायालयाने दोषसिद्धी नोंदवत 4 आरोपींना कडक शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई मुंबईतील कायदा-व्यवस्थेच्या कडकपणाचा आणि परकीय नागरिकांच्या गैरकायदा प्रवेशाविरुद्ध पोलिसांच्या सजगतेचा दर्शक आहे.
दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी टाईम्स ऑफ इंडिया ब्रिजच्या खाली, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ मालाड पूर्व येथे 1 बांग्लादेशी पुरुष अवैध वास्तव्य करत असताना आढळून आला. त्यानंतर दिनांक 7 मार्च 2025 रोजी ओमकार एसआरए बिल्डींगच्या गेटजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ 1 पुरुष व 2 महिला बांग्लादेशी नागरिक अवैध वास्तव्य करत असताना पोलिसांच्या झपाट्याने कारवाईत आढळले.
परिमंडळ 12 अंतर्गत अवैध वास्तव्य प्रतिबंधित करण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; 33 आरोपींना अटक
कुरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यात संशयितांच्या विरोधात ठोस पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब आहेत. याप्रमाणे, कोर्टाने 2 पुरुष व 2 महिला आरोपींना दोषी ठरवून कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना भारतातून हद्दपार करण्याचा आदेशही किल्ला कोर्टाने दिला आहे.
परिमंडळ 12 अंतर्गत जानेवारी 2025 पासून आतापर्यंत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरीकांविरुद्ध एकूण 27 गुन्हे नोंदवले असून, याप्रसंगी 33 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या कडक कारवाईमुळे मुंबईतील नागरी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कुरार पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मेदगे, पोलीस हवालदार शकील शेख, शशिकांत पवार, पोलीस शिपाई विजय कांबळे, महिला पोलीस शिपाई श्रेया मिठबावकर यांनी कारवाई पार पाडली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…