Mumbai Latest Crime News : आजी उपचारासाठी विनवणी करत होती, नातवाने जंगलात नेत फेकले,सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा सुगावा; आरोपी अटकेत
मुंबई | मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंतःकरण हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या आजारी आजीला उपचाराऐवजी अंधाऱ्या रात्री सुनसान ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देणाऱ्या एका नातवाविरोधात आरे कॉलनी पोलिसांनी Array Colony Police Station गुन्हा दाखल केला आहे. पीडित वृद्ध महिला यशोदा गायकवाड (वय 70) या सध्या जूहू येथील कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. Mumbai Police Latest News
ही धक्कादायक घटना 22 जून रोजी मध्यरात्री 4 वाजता घडली. नातवाने उपचाराच्या बहाण्याने आजीला ऑटोमध्ये बसवले आणि थेट आरे कॉलनीच्या जंगलातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन फेकून दिले. वयोवृद्ध महिला तब्बल 5 तास तेथे बेहोश अवस्थेत पावसात पडून होत्या. सकाळी 7 वाजता काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र सुरुवातीला त्यांचा सडलेल्या चेहऱ्यामुळे उपचार नाकारले गेले.
नातवाच्या विरोधात भा.दं.सं. कलम 125 आणि जेष्ठ नागरिक अधिनियम 2007 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नातवाने सुरुवातीस “आजी स्वतः आरे कॉलनीत गेल्या” असे खोटे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपासादरम्यान 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी आजीला ऑटोने जंगलात नेत असल्याचे स्पष्ट झाले.
यशोदा गायकवाड यांना स्किन कॅन्सर असून, महिन्याला 10 ते 15 हजार रुपये उपचार खर्च होत होता. त्यांच्या मालकीची एक भाडेकरू दुकान होती, त्याच उत्पन्नातून उपचार चालत होते. मात्र, कधीकधी त्यांना पॅनिक अटॅक येत असल्यामुळे नातवाला त्रास होतो होता, असे तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने यशोदा गायकवाड यांच्यावर मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या त्यांच्यावर बीएमसीच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…