मुंबईतल्या गोवंडी परिसरात घडलेल्या ४५ लाख रुपयांच्या भन्नाट चोरीचा अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी धडाकेबाज पर्दाफाश करत सर्वांना थक्क केले आहे.
घटनेचा तपशील
१९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता वडाळ्यातील भक्ती पार्क येथील तेजप्रकाश डांगी यांच्या विश्वासू नोकरांनी विश्वासघाताचा खेळ रचला.
चालक म्हणून काम करणारे नितेशकुमार महतो व राहुलकुमार महतो यांनी डांगी यांच्या गाडीत ठेवलेली ₹४५ लाखांची कॅश बॅग संगनमताने उचलून बेपत्ता झाले.
सीमापार पाठलाग
हा मोठा आर्थिक गुन्हा लक्षात येताच
परिमंडळ ०६ चे उपआयुक्त समीर शेख,
सहायक आयुक्त रामराव ढिकले
आणि वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
विशेष गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहारच्या शोध मोहिमेवर रवाना झाले.
गुप्त बातमीदारांचा वापर, तांत्रिक तपास आणि सहा दिवसांचा अविरत प्रवास –
पोलिसांनी दुर्गम समस्तीपूर (बिहार) परिसरातील दऱ्या–खोर्यात लपलेल्या आरोपींना शिताफीने शोधून नोटीससह मुंबईत हजर केले.
रोकड हस्तगत
अटक आरोपींकडून ₹३६,३५,६०० रोख रक्कम जप्त करण्यात आली असून
उर्वरित रकमेसाठी पुढील तपास वेगाने सुरू आहे.
🕵️♂️ आरोपींची माहिती
1️⃣ नितेश राम विलास महतो
2️⃣ दिपककुमार राम विलास महतो
पोलिसांचा पराक्रम
ही थरारक कामगिरी
पोलीस आयुक्त देवेन भारती,
सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी,
अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.नि. निलेश पोळ, सपोनि नंदुलाल पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील शूर अधिकारी व जवानांनी अत्यंत कौशल्याने पूर्ण केली.
विश्वासघात करणाऱ्या ‘कोट्याधीश’ नोकरांना गजाआड करून तब्बल कोट्यवधींचा रोकडसाठा परत मिळवणाऱ्या या मोहिमेने गोवंडी पोलिसांचे नाव पुन्हा एकदा अंमली व गुन्हेगारीविरोधी लढ्यात ठळक केले आहे!
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…