•मीरा-भाईंदर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ‘स्टॉप पेमेंट’चा चेक देऊन विश्वासघात; आरोपीवर फसवणुकीचे जुने 7 गुन्हे दाखल
भाईंदर :- फ्लॅट खरेदीच्या नावाखाली सोन्याचे व्यापारी अशोक जितमल जैन यांचा विश्वास संपादन करून, तब्बल 27 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या एका सराईत ठगाला गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीरा यांनी अटक केली आहे. आरोपी तारकेश्वर गोरखनाथ पांडे उर्फ रोहीत पांडे हा सतत दिल्ली, नोएडा आणि मुंबईमध्ये आपले ठिकाण बदलत होता.
भाईंदर पश्चिम येथील सोन्याचे व्यापारी अशोक जैन यांची ओळख जुलै 2025 दरम्यान NoBroker.Com या ॲपवरून आरोपी तारकेश्वर पांडे याच्याशी झाली होती. फ्लॅट विक्री करण्याच्या उद्देशाने ही ओळख झाली होती. आरोपी पांडे याने फिर्यादींना भेटून विश्वासात घेतले आणि फ्लॅट खरेदीसाठी 66 लाखांचा चेक ॲडव्हान्स म्हणून दिला.
या चेकच्या आधारावर विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादींकडून एकूण 249.350 ग्रॅम सोन्याचे दागिने स्वीकारले. मात्र, सोने ताब्यात येताच आरोपीने दिलेला 66 लाखांचा चेक त्वरित बँकेतून ‘स्टॉप पेमेंट’ करून दागिन्यांचा अपहार केला. यामुळे फिर्यादीची 27.50 लाखांची फसवणूक झाली आणि त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपी तारकेश्वर पांडे हा स्वतःची ओळख लपवून फरार झाला होता. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने दिनांक 27/11/25 रोजी त्याला फाऊंटन हॉटेल, वर्सावा नाका, ठाणे येथून ताब्यात घेतले.
तपासात आरोपी पांडे याच्यावर फसवणुकीचे मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीच त्याच्यावर भाईंदर, मिरारोड, कुरार, कासारवडवली, व्ही.बी. नगर आणि मालाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 420,406 यांसारखे सात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…