मुंबई

Mumbai Crime News : “दरमहा 18% नफा मिळवा!” म्हणत करोडोंचा गंडा – ‘ए.जे. इंटरप्रायझेस’ घोटाळा उघड

•मुंबई, नवी मुंबई ते प्रयागराज – शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

मुंबई | “दरमहा 18% नफा देतो, तुमचं आयुष्य बदलेल!” अशा गोंडस आश्वासनांनी सामान्य माणसांचे डोळे दिपवून शेकडो लोकांना गंडावणाऱ्या ‘ए.जे. इंटरप्रायझेस’ नावाच्या बनावट कंपनीचा भंडाफोड करण्यात मालमत्ता कक्ष गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक उघडकीस आली आहे.

अटक आरोपी – अंकित जैन, हेतुल रांका आणि ओमकार सिंग – यांनी गोरेगाव येथून कंपनी सुरू करून लोकांना ‘कॉर्पोरेट पेपर ट्रेडिंग’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. लोकांनी लाखो-कोटी रुपये गुंतवले. काहींना सुरुवातीला थोडा परतावा देऊन जाळ्यात अडकवण्यात आले. पण प्रत्यक्षात हा सर्व प्रकार एक ‘पॉन्झी स्कीमचा जाळं’ असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

जेव्हा गुंतवणूकदारांनी परतावा मागायला सुरुवात केली, तेव्हा कंपनी कार्यालयात गोंधळ, शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू झाले. अनेकांना दहशतीने गप्प बसवलं गेलं. काहींनी पोलिसांत धाव घेतली आणि त्या आधारावर मालमत्ता कक्षाने सखोल तपास सुरू केला.

या घोटाळ्याचा थरकाप उडवणारा भाग म्हणजे – याचे जाळे फक्त मुंबईपुरते मर्यादित नाही. नवी मुंबई, प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथेही गुंतवणूकदार बळी ठरले. 200 ते 300 लोकांना गंडवून काही कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलिसांनी आरोपींना त्यांच्या कार्यालयातच सापळा रचून अटक केली. आरोपींकडून सोने, रोख रक्कम, दागिने स्वीकारले गेले असल्याचीही कबुली मिळाली आहे. यापूर्वीही यांच्यावर गुन्हे नोंद असल्याचं तपासात समोर आलं आहे.गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपींन विरुध्द यापूर्वी लो.टी. मार्ग, गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद असल्याचे तपासामध्ये दिसून आले आहे.

पोलीस आयुक्त देवेन्द्र भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे) निशीथ मिश्र, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी विशेष) किशोरकुमार शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, पोलीस उप निरीक्षक योगेश कन्हेरकर, पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी, पोलीस उप निरीक्षक इंद्रजित सिरसाट, महिला पोलीस उप निरीक्षक पल्लवी कोतवाल, सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार अरुण सावंत, तुषार सावंत, विश्वनाथ पोळ, संतोष औटे, अमित वसावे, प्रमोद कांबळे, अमित करपाते, पोलीस शिपाई निलेश डोंबाळे, धुळदेव कोळेकर, आदित्य जाधव, महिला पोलीस शिपाई नयना पाटील, रंजना निचिते, श्रेणी पोलीस उप निरीक्षक चा पासी, पोलीस हवालदार किरण जगदाळे यांनी केली आहे.

vivek

Recent Posts